पुणे : खडकवासला धरणात तरुण आणि तरुणीचा तरंगताना आढळला मृतदेह

पुण्यातील खडकवासला धरणात तरुण आणि तरुणीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या दोघांची ओळख पटली नसून दोघांच वय अंदाजे १८ ते २१ असण्याची शक्यता हवेली पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणालगत सोनपूर गाव आहे. तेथील मुख्य रस्त्यावर दुचाकी एका व्यक्तीला दिसली.

त्यामुळे त्याने थोड पुढे जाऊन पाहिल्यावर पाण्यात एक बॅग तरंगताना दिसली.तर तेथून काही अंतरावर पाण्यात एक मुलगा आणि मुलगी तरंगताना दिसले.या घटनेची माहिती आम्हाला मिळताच,आम्ही काही वेळात घटनास्थळी दाखल झालो.त्या दोघांना जवळील रुग्णालयात दाखल केले असता.

डॉक्टरांनी दोघांची तपासणी केल्यावर, त्यांना मृत घोषित केले. तसेच घटनास्थळी असलेल्या बॅगची तपासणी केल्यावर त्यात एक वही आढळून आली आहे.त्यावर प्रियांका चौगुले अस नाव असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्या दोघांच नेमक नाव समजू शकले नाही.तसेच या घटनेचा अधिक तपास हवेली पोलिस करीत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *