पुणे : खंबाटकी घाटात कंटेनर बंद पडल्याने वाहतूक ठप्प

खंडाळा : पुणे - सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात सिंगल लेन असणाऱ्या व सातारा बाजुकडे जाणाऱ्या घाट माथ्यावर दत्तमंदीर जवळ कंटनेर (एच आर 55 एल 7532) बंद पडल्याने या बाजुची वाहतूक काही काळ विस्कीळ झाली. दरम्यान वहातुक पोलिस विठ्ठल पवार व पोलिस अमंलदार जगदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ही वाहतूक बोगद्या मार्गे वळवली. सकाळी सव्वा आठवाजल्यापासुन ही वाहतूक वळविण्यात आली. यामुळे सातारा हुन पुणे बाजुकडे येणाऱ्या एस वळणावर सध्या दोन्हीही बाजुने वाहतूक सुरु आहे. घाटात बंद पडलेला कंटनेर बाजुला करण्यासाठी पोलिस पवार,जगदाळे हे घटनास्थळावर थांबुन वहातुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *