पुणे: कुचिक प्रकरण: चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, आरोप करणारे आता कुठे आहेत?

पुणे: शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात पीडितेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ तरुणीच्या मदतीसाठी पुढे आल्या. मात्र या तरुणीनं चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केली की, वाघ यांनीच कुचिक यांच्याविरोधात जबरदस्ती पोलीस तक्रार दाखल करण्यास आणि जबाब देण्यास भाग पाडले. पीडित तरुणीच्या या आरोपांनंतपर चित्रा वाघ यांच्यावर विरोधक तुटून पडले होते. मात्र आज पुन्हा तरुणीनं माध्यमांसमोर येत कुचिक बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. यानंतर चित्रा वाघ यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत माझ्यावर आरोप करणारे आता कुठे आहेत? असा सवाल करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असा आरोप केला.

पीडित तरुणीने सामटीव्हीशी बोलताना कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केले. पीडित तरुणीनं आरोप केला की, रघुनाथ कुचिक यांनी बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला आहे. जर गुन्हा मागे घेतला नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी कुचिक यांनी दिली असाही आरोप या पीडित तरुणीनं केला. तसेच बंदुकीचा धाक दाखवून समजूतीच्या करारावर सह्या घेतल्या असंही तरुणीचं म्हणणं आहे. याबाबत पीडित तरुणीने मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-मेल पाठवत न्याय देण्याची मागणी केली आहे. 

याप्रकरणी चित्रा वाघ म्हणाल्या की, मी या तरुणीला मदतच केली आहे. मात्र आता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. पण ज्या पद्धतीने माझ्यावर खोटे आरोप झाले आहे, त्याबाबत मी पोलिसांना पत्र दिलं आहे. माझ्यासाठीही हा नवा अनुभव होता. पुर्ण ताकदीने तिच्यासोबत उभं राहिलं असतानाही तिने माझ्यावर आरोप केले. सुरुवातीला फेब्रुवारीपासून माझ्याशिवाय तिच्यासोबत कुणी नव्हतं, पण ज्यादिवशी तिने चित्रा वाघचं नावं घेतलं त्यादिवशी सगळे माझ्यावर तुटून पडले. माझ्यावर खोटे आरोप केले, ज्या महिलांनी माझ्याविरोधात आंदोलनं केली, माझ्याविरोधात वाटेल तसं बोलंल गेलं. या सगळ्या महिलांनी आता उभं रहावं. एखादी केस हातात घेतली की, त्याचं फॉलोअप घ्याययं असतं. त्या मुलीला कोण धमकी देतंय? कोण तिला बंदूक दाखवतंय? याचा तपास व्हायला हवा.

माझ्यासारख्या हजारो महिला असा पीडित मुलींना मदत करत असतात. पण, असा अनुभव येत असेल तर त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. चित्रा वाघचं नाव आल्यावर ज्यांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या त्यांनी आता पुढे येत त्या मुलीच्या पाठीशी उभ रहावं. तक्रार करावी, पोलिस स्टेशनच्या बाहेर आंदोलनं करावी असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply