पुणे : कात्रज बोगद्यामध्ये चारचाकी वाहनाला भीषण आग

कात्रज नवीन बोगद्यामध्ये एक चारचाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथून सातार्‍याच्या दिशेने एक कुटुंब चार चाकी वाहनातून कात्रज बोगद्यातून ११ वाजण्याच्या सुमारास जात होते. तेवढय़ात गाडीच्या पुढील भागातून धूर येत होता.

गाडी बाजूला घेऊन सर्वजण खाली उतरले. त्याच दरम्यान गाडीने पेट घेतला आणि या घटनेची माहिती आम्हाला मिळताच, आम्ही काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलो. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *