पुणे : कात्रज घाटात रिक्षाचालक महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; प्रवासी अटकेत

पुणे : प्रवासी म्हणून बसलेल्या एकाने रिक्षाचालक महिलेशी अश्लील कृत्य केले. प्रवाशाने रिक्षाचालक महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज घाटात नुकतीच घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणास अटक केली. याप्रकरणी निखिल अशोक मेमजादे (वय ३०, रा. शंकर मठ, हडपसर) याला अटक करण्यात आली. याबाबत रिक्षाचालक महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला ही कात्रज भागात रिक्षा चालविते. हडपसर भागातील मगरपट्टा परिसरात आरोपी मेमजादे रात्री रिक्षात बसला. कात्रजला जायचे असल्याचे त्याने सांगितले. रात्री दहाच्या सुमारास कात्रज घाटात रिक्षा थांबविण्यास सांगितले. घाटातील एका लाॅजकडे रिक्षा नेण्यास आरोपीने सांगितले. मेमजादेने रिक्षाचालक महिलेला हाॅटेलमध्ये जेवण करण्यास जाऊ, असे सांगितले. महिलेेने नकार दिल्यानंतर मेमजादेने तिला चापट मारली. तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

Follow us -

आरोपी मेमजादे रिक्षात विवस्त्र झाला. तुझ्या मदतीला कोणी येणार नाही, असे सांगून त्याने तिला धमकावले. रिक्षाचालक महिला घाबरून पळाली. तेव्हा मेमजादेने तिचा पाठलाग केला. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन मेमजादेला पकडले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply