पुणे :औंधमध्ये उच्चभ्रू भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

पुणे : औंध परिसरामध्ये एका उच्चभ्रू भागात ‘द व्हाइट विलो स्पा’ या मसाज सेंटरच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचा सामाजिक विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकारात आसाम येथील एकाला अटक करून मुंबईतील एका मॉडेलसह आसाम, मणिपूर येथील एकूण सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

‘द व्हाइट विलो स्पा’चा सहायक व्यवस्थापक सुफियान जमालुद्दिन अहमद (२३, रा. रिद्धी कॉम्प्लेक्स, माधुरी पार्क सोसायटी, औंध) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्पाचा मालक वेंकटेश टिपू राठोड (३८, रा. बर्मा शेल, लोहगाव रोड, इंदिरानगर), व्यवस्थापक देवीसिंग ऊर्फ लीलाधर शंकरसिंग चव्हाण (३०, रा. जयप्रकाशनगर, लोहगाव), सदनिकेचा मालक अभिनव रामनाथ वाजपेयी (फ्लॅट नं. ३०३, रिद्धी कॉम्प्लेक्स, माधुरी पार्क को-ऑप सोसायटी, कोटबागी हॉस्पिटलजवळ, औंध) आणि मोना रामनाथ वाजपेयी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकताना बनावट ग्राहक पाठविण्यात आला. ग्राहकाने ‘एक्स्ट्रा सर्व्हिस’साठी ऑनलाइन पद्धतीने पैसे दिल्यावर आणि ते स्वीकारल्यानंतर त्याने पोलीस पथकाला इशारा केला. काउंटरवर बसलेल्या सुफियानने सीसीटीव्हीत पोलिसाना येताना पाहिले. त्यामुळे स्पाचा दरवाजा बंद करण्यात आला. सुफियान याने पळून जाण्यासाठी दोन महिलांसह सदनिकेच्या खिडकीतून एसीच्या डक्टमध्ये प्रवेश केला.

तेथून वरचा मजला गाठून खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पकडण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला विचारणा केली असता, तिने स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना शेजारच्या इमारतीतील सदनिकेत ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन इतर महिलांची सुटका केली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply