पुणे : ऑनलाइन शॅापिंग महागात मोबाईलऐवजी साबणाची वडी

ऑनलाइन मोबाईल संच खरेदी केल्यानंतर चोरट्यांनी तरुणीला मोबाईल ऐवजी साबणाची वडी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांकडून चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गुलटेकडीतील इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तिने एका संकेतस्थळावरुन ऑनलाइन पद्धतीने ४५ हजारांचा मोबाइल संच खरेदी केला होता. चोरट्यांनी तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. नवीन मोबाईल संच उपलब्ध झाला असून मोबाईल घेण्यासाठी त्वरीत लष्कर भागात यावे लागेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली.

त्यानंतर तरुणी लष्कर भागातील व्हिक्टरी चित्रपटगृह परिसरात गेली. चोरट्यांनी तिला खरेदी केलेला मोबाईल संच दाखविला. त्यानंतर मोबाईल संच खोक्यात ठेवला. चोरट्यांनी खोक्यात मोबाईल संच देण्याचा बहाणा करुन दुसरे खोके दिली. तरुणी घरी पोहोचली. तिने खोके उघडून पाहिले. तेव्हा मोबाईल ऐवजी साबणाची वडी खोक्यातून दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply