पुणे : ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनासाठी निधीची कमतरता नाही; चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

पुणे : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयातर्फे राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि दुरुस्ती कामांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यात जेजुरी येथील मंदिराच्या संवर्धन कामाच्या रेखाचित्रांसह किल्ल्यांचे त्रिमितीय रेखांकन (थ्री डी मॅपिंग), छायाचित्रे, आराखड्यांचा समावेश असून, ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतन कार्याबाबतीत शासन गंभीर असल्याने त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

पुरातत्व विभाग पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत जागतिक वारसा सप्ताहानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन कोथरूड येथे आयोजित  उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, पुणे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. 

जुन्या वारशाचे शोधकार्य करणे, त्याचे जतन करणे आणि अभिमान म्हणून समोर मांडणे हे काम या प्रदर्शनातून होईल असे पाटील यांनी सांगितले. राज्यातील मजबूत, सुरक्षित किल्ल्यांचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. ते समोर आणण्याचे काम विभागाने करावे. या विषयाबद्दल समाजात कुतूहल आहे. या क्षेत्रात अधिक शोध घेऊन काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. बांधकामास घाईने परवानगी दिल्यास पुरातन वास्तू, वस्तूंच्या जतन कार्यास बाधा येईल. त्यामुळे परवानगी देताना पुरातत्व विभागाने आवश्यक वेळ घेणे स्वाभाविक आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply