पुणे : उरुळी कांचन येथील सोरतापवाडी येथे सायकल खेळताना कॅनेलमध्ये पडून सख्या बहिण-भावाचा मुत्यु

उरुळी कांचन : सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जुना बेबी कालव्याजवळ सायकल खेळताना कॅनलमध्ये पडून दोन सख्या बहिण-भावाचा मुत्यु झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.१८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. जागृती दत्ता ढवळे (वय-6), आणि शिवराज दत्ता ढवळे ( वय-३, दोघेही रा. सोरतापवाडी, ता.हवेली, मूळ रा. देऊळगाव ता. परंडा जि. उस्मानाबाद ) असे मृत्यू झालेल्या बहिण भावाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जागृती आणि शिवराज हे दोघेजण सोमवारी (ता.१८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खेळत होते. जागृती सायकल चालवीत होती. तर शिवराज हा सायकलच्या पाठीमागील सीटवर बसला होता.बेबी कालव्याच्या पलीकडे जागृती आणि शिवराज यांची आत्या राहते. दोन्ही मुले सायकल वरून आत्याकडे चालले होते. तेव्हा कॅनेलवरील रस्त्यावरून जात असताना सायकल घसरली. आणि सायकलसहित दोन्ही मुले कॅनेलमध्ये पडली.दरम्यान,जागृती आणि शिवराज हे सायकल खेळत होते. आठ वाजले तरी अजून घरी आले नाहीत. तेव्हा दोन्ही मुलांची आई मुलांना शोधण्यासाठी मुलांच्या आत्याच्या घरी गेले. परंतु मुले तेथेही आढळून आली नाहीत. मुलांचा परिसरात शोध घेत असताना मुलांची सायकल व चप्पल जुना बेबी कॅनल च्या जवळ पडलेली दिसली.

सोरतापवाडी येथील तरुणांनी कॅनलमध्ये दोन्ही मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. युवकांनी कालव्यात उतरून सुमारे दोन - तीन किलोमीटर कालव्याचे पात्र तपासून बालकांचा शोध घेतला. तेव्हा दोन - तीन किलोमीटर अंतरावर रात्री दहा व अकरा वाजण्याच्या सुमारास बालके जलपर्णीत अडकून आढळून आली. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

जागृती आणि शिवराज यांच्या अचानक जाण्याने ढवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. तसेच दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे सोरतापवाडी गावावर शोककळा पसरली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply