पुणे: उंड्रीतील युरो शाळेत पालकांना धक्काबुक्की; शालेय शुल्काबाबत केली होती तक्रार

पुणे - बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेतील बाऊन्सर्सकडून पालकांना धक्काबुक्की झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता उंड्री येथील युरो शाळेत देखील असाच प्रकार घडल्याला आहे. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेल द्वारे टीसी पाठवले होते.

या शाळेत विद्यार्थ्यांना थेट प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेशावेळी पालक शाळेत गेल्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाली. पालकांना बराच वेळ गेटबाहेर थांबवून ठेवण्यात आले होते. यावेळी शाळेकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने पालकांनी संताप व्यक्त. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक माहिती घेत आहेत असं कोंढवा पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिबवेवाडी क्लाइन मेमोरियल शाळेत पालकांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर हा मुद्दा अधिवेशनातही गाजला होता. यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आता शिक्षणमंत्र्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply