पुणे – इंधन दरवाढीला ई-मोबिलिटी हे व्यवहार्य उत्तर – आदित्य ठाकरे

पुणे - पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीकडे  राजकीय दृष्टिकोनातून पाहून आंदोलने  केली जातात. मात्र, इंधन दरवाढीला विद्युत दळणवळण (ई-मोबिलिटी) (E-Mobility) हे व्यवहार्य उत्तर आहे. त्यामध्ये पुण्याने आघाडी घेतल्यास, मोठे परिवर्तन घडू शकेल, असा विश्वास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (ता. ५) व्यक्त केला.

पुणे पर्यायी इंधन परिषदेच्या समारोप कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नायर, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘पुणे हे शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पनांचे शहर आहे. त्यामुळे पर्यायी इंधनावरील परिषद या शहरात होणे आवश्यक होते. पुण्याने एक पाऊल पुढे टाकले, तर बदल शक्य आहे. प्लॅस्टिक बंदीलाही पुण्यातूनच सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. जगभरातील विविध देशांचे राजदूत या परिषदेत सहभागी झाल्याने या परिषदेचा संदेश जगभरात जाईल.

परिषदेच्या समारोप कार्यक्रमात पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील दहा महापालिकांचे आयुक्त सहभागी झाले होते. शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन आणि पर्यायी इंधन वापरास गती देण्यासंदर्भात त्यांनी पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा केली. या संदर्भातील संयुक्त घोषणापत्रावरही त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply