पुणे : अयोध्या दौऱ्यावरुन ट्रॅप रचला होता; राज ठाकरेंचा आरोप

पुणे: मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यापासून राज ठाकरे चांगलेच चर्चेत आले आहेत. गुढी पाडवा मेळ्यात त्यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंग्यावरुन इशारा दिला होता. यानंतर त्यांच्यावर राज्यातून टीका करण्यात आल्या. यानंतर मुंबईत शिवसेनेनेच्या झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला. मनसेची पुण्यात सभा होत आहे. अयोध्या दौरा का रद्द केला याचे कारण राज ठाकरे यांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यावरुन मोठा ट्रप रचण्यात आला होता, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या पोटात दुख:यला लागले म्हणात राज ठाकरे यांनी शिवनसेनेवर नाव न घेता टीका केली. अयोध्येतील एक खासदार उठून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात बोलता, ही मोठी गोष्ठ आहे. अयोध्येत मोठा ट्रॅप रचला होता. अयोध्येत काही झाले असते तर मनसेच्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या असत्या, मला माझ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणायचे नाही, अस राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले.

यावेळी राज ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. मातोश्री बंगला काय मशिद आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला. आपलं हिंदुत्व झोंबल बाकी काही नाही अशी टीका हिंदुत्वावरुन राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आपल्या सभेला हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा मात्र त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की हल्ली आम्ही कुणालाच देत नाही. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत, उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply