पुणे : अग्निपथ’साठी बनावट रहिवासी प्रमाणपत्र देणारे दोघे अटकेत

पुणे : केंद्रीय संरक्षण विभागाच्या अग्निपथ योजनेत सैन्य भरतीसाठी बनावट रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट ) काढून देणाऱ्या दोन दलालांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.पोपट विठ्ठल आलंदार (वय ३८) आणि सुरेश पितांबर खरात (वय ३१, दोघेही रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे कोरे दाखले, डोमिसाइल प्रमाणपत्र, रोकड तसेच अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. कात्रज -देहूरोड बाह्यवळण रस्त्यावर आलंदार आणि खरात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा लावून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे बनावट रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे कोरे दाखले आढळले.

लष्करातील नोकरीसाठी भरतीसाठी सध्या मुंबईत अग्निपथ भरती सुरू आहे. त्यात जी डी (जनरल ड्युटी) आणि टेक्निकल अशा दोन पदांसाठी भरती होत आहे़ त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील रहिवासी अर्ज करू शकतात. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही उमेदवारांनी एका संस्थेत संपर्क साधला. आलंदार आणि खरात यांनी बनावट शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी पुरावा तयार करण्यासाठी बनावट भाडे करार तयार केले. सरपंचाचा दाखला घेऊन बनावट रहिवासी प्रमाणपत्र तयार करुन घेतले.

४० उमेदवारांना बनावट रहिवासी प्रमाणपत्रे

आरोपी आलंदार आणि खरात ४० उमेदवारांना बनावट रहिवासी प्रमाणपत्रे तयार करून घेतल्याचे प्राथमिक तापसात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply