पुणे : अंमली पदार्थ विक्री प्रकरणात तिघांना पकडले; साडेनऊ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

पुणे : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना पकडले. बंडगार्डन रस्ता, मार्केट यार्ड, कोरेगाव पार्क भागात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चरस, गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) असे नऊ लाख ३४ हजारांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने मार्केट यार्ड भागात चरस विक्री करण्यासाठी आलेल्या सुरेश सिद्धराम नाटेकर (वय ३३, गंगाधाम, मार्केट यार्ड) याला पकडले. त्याच्याकडून दोन लाख ३१ हजारांचे २३१ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. कोरेगाव पार्क भागात अमली पदार्थ विक्री प्रकरणात आकाशचंद्र पार्थव नायक (वय ३७, रा. ओदिशा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चार लाख ८३ हजार रुपये किंमतीचा २४ किलो गांजा जप्त करण्यात आला.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात एकजण मेफेड्रोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जावेद अजीज सय्यद (वय ३३, रा. मीठानगर, कोंढवा) याला पकडले. त्याच्याकडून दोन लाख १० हजारांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. डी. नरके, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, आझीम शेख आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply