पुणे :अंडरटेकिंग घेणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करावा

उंड्री : शुल्कासाठी वेठीस धरणाऱ्या युरो स्कूलची दादागिरी सुरू असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अंडरटेकिंग घेणाऱ्या युरो स्कूलच्या मुख्याध्यापिकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालकांनी केली. मात्र, पालकांनीच मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करावा, असे शिक्षण उपसंचालकांनी सांगितल्याचे पालकांनी सांगितले.

पालक अंजली हर्षे, अमोल हर्षे, भ्रांती गाडे, विजय धुमाळ, जगदीश अभंग, पुष्पा चौधरी, देव ढमाळ, गजानन देशमुख म्हणाले की, शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांची भेट घेऊन मुलांना शाळेत प्रवेश दिले नाहीत, काही पालकांनी भीतीपोटी शुल्क भरण्यास तयार होते, त्यांच्याकडून शाळा अंडरटेकिंग लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याऐवजी प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव पाठवावा. प्रशासक नेमल्यावर शाळेतील सत्यता सर्वांसमोर येईल. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या महिला पालकाबरोबर सुरक्षारक्षकाने धक्काबुक्की केली, त्या त्यांच्याकडून जबरदस्तीने अंडरटेकिंग लिहून घेतले आहे. ही बाब उपसंचालकांच्या निदर्शनास आणून दिली. या सर्व गोष्टी शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्या कानावरती घातल्या. त्यावेळी शाळेची मान्यता काढण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती पालकांनी दिली.

युरो स्कूलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, त्यानंतरही व्यवस्थापनाच्या वर्तनात फरक पडला नाही, त्यामुळे शाळेवर शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) कलम 12क नुसार चौकशी लावली असून, आठ दिवसांमध्ये चौकशी करून मान्यता काढून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांचा प्रवेश कमी करण्याचा अधिकार शाळांना नाहीत. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी सज्जड दम शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, मुजोर शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

दरम्यान, शाळा प्रशासनाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply