पुणे : अंगारकी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पहाटेपासूनच रांग

पुणे : वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली. आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच लांबच्या लांब रांग लावल्या आहेत. अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.

पहाटे चार ते सहा या वेळात पंडित जितेंद्र अभ्यंकर आणि सहकाऱ्यांनी बापाच्या चरणी गायन सेवा सादर केली. त्यांच्यासह भाग्यश्री अभ्यंकर, तनवी अभ्यंकर यांनी गायन केलं. तर केदार परांजपे,निलेश देशपांडे,अपूर्व द्रविड,आणि विशाल गंड्रतवार यांनी साथ संगत केली.

अंगारकी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषत महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो. अंगारकी चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत कोणिही करू शकते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृती चतुर्थी. या व्रतात दिवसभर उपवास करतात. उपवासानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करतात.

वर्षात १२ महिन्यांमध्ये एकुण २४ चतुर्थी त्यापैकी १२ कृष्णपक्षात असतात तर १२ शुक्ल पक्षात असतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. त्यातही जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी चतुर्थी म्हटली जाते. इतर संकष्टी चतुर्थीपेक्षा याला विशेष महत्व आहे.देशभरात भाविक या चतुर्थिला विशेष महत्व देतात. देशभरात विविध गणेश मंदिर या काळात भक्तगणांनी भरून जातं. मंदिराबाहेर भाविकांच्या तासन् तास रांगा लागलेल्या असतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply