पुणेकर कुडकुडले! पुण्यात ७.४ अंश डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

पुण्यात या हंगामातील नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून पुण्यात थंडी वाढू लागली आहे. पुण्यात २ दिवस थंडी राहील त्यानंतर हळू हळू तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर भारतात थंड वाऱ्यांचा प्रभाव जोर धरत असल्याने राज्यात थंडी वाढली आहे. पुढील २ दिवस थंडी ची लाट कायम राहील. बुलढाणा, गोंदिया, नागपूर मध्ये पुढील २ दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ही थंडी ची लाट असण्याची शक्यता तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील थंडी कायम राहील, हवामान विभगाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply