पीएमपीएल बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात सहा प्रवासी जखमी ;सातारा रस्त्यावरील घटना

पुणे : पीएमपीएल बसचे ब्रेक फेल झाल्याने सहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील घटना घडली. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे गंभीर दुर्घटना टळली.

कात्रज स्थानकातून लोहगावकडे जात असलेल्या पीएमपी बसचे धनकवडीतील राजर्षी शाहू बँकेसमोर ब्रेक निकामी झाले. भारती विद्यापीठ ते धनकवडीपर्यंत उतार आहे. तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याचे पीएमपी बसचालकाच्या लक्षात आले. त्यानंतर पीएमपी चालकाने प्रसंगावधान राखून बसचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बस श्री शंकरमहाराज उड्डाणपुलाच्या खांबावर आदळल्याने बसचा वेग कमी झाला.

खांबावर बस आदळल्याने झालेल्या अपघातात बसच्या दर्शनी भागाची काच फुटली तसेच बसचा उजवा भाग चेपला गेला. अपघातात सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर बालाजीनगरमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले. धनकवडीतील राजर्षी शाहू बँक चौक गजबजलेला आहे. या चौकात खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने आहेत. बसचालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे गंभीर दुर्घटना टळली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply