पिंपरी : शैक्षणिक कर्ज देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक

पिंपरी : पाच लाख रुपये शैक्षणिक कर्ज देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार देहूरोड येथे घडला. केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मोनिसा आयुब खान (रा. उर्दू शाळेजवळ, देहूरोड) या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजीत ठाकर, जगदीश कुमार नडियाल यांच्यावर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी या शैक्षणिक कर्जासाठी लिंक शोधत असताना डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट लक्ष्मीनारायण एलटीडी डॉट कॉम यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. आरोपींनी त्यांना ऑनलाईन पाच लाख शैक्षणिक कर्ज देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी चार्ज, टॅक्सेशन चार्जेस, कंपनीचे सिक्युरिटी चार्ज, आरबीआयचे पाच टक्के व्याज असे ९० हजार ३५० रुपये फोन पे द्वारे आरोपींनी घेतले. त्यानंतर फिर्यादीला कसलेही कर्ज न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply