पिंपरी- चिंचवडमध्ये लव्ह जिहाद विरोधात हिंदू समाज आक्रमक; विविध मागण्यांसाठी काढला विराट मोर्चा

पिंपरी- चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये सकल हिंदू समाजाकडून विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गो-हत्या विरोधात कायदा अंमलात आणावा या प्रमुख  मागणीसाठी हिंदू समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. चिंचवड महाविहार चौक ते पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

टिकलीवर श्रद्धा असती तर श्रद्धा आज टिकली असती या फलकाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. हिंदू धर्मियांच्या विरोधात होत असलेला घटनांचा फलकाद्वारे निषेध करण्यात आला.  देशभरात लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गो-हत्या विरोधी कायदा अंमलात यावा या प्रमुख मागणीसाठी पिंपरी- चिंचवडच्या सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने हिंदू समाजातील तरुण, तरुणी आणि बालगोपाल सहभागी झाले होते.

वारकरी संप्रदायाच शिक्षण घेणारी मुलं देखील या मोर्चात सहभागी झाले होते. डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवा झेंडा घेऊन तरुण मोर्चात दिसत होते. जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. पिंपरी- चिंचवड शहरात पहिल्यांदाच सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा झाला आहे. काही अनुश्चित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. हिंदू समाजाच्या मागण्या आता पूर्ण होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply