पिंपरी-चिंचवडमध्ये टँकर मधून ऑइल गळती झाल्याने वाहतुकीत अडथळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौक येथे ऑइल सांडल्याने 15- 20 दुचाकी चालक घसरून पडल्याची घटना घडली आहे. यात काही दुचाकी चालक जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. डांगे चौक येथील ग्रेडसेप्रेटरमध्ये ऑइल सांडल्याने त्यावरून घसरून अनेक दुचाकी चालक पडले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून पाण्याने रस्ता स्वच्छ केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास डांगे चौक येथे, ग्रेडसेपरेटरमध्ये टँकर मधून ऑइल गळती होऊन 15- 20 दुचाकी चालक घसरून पडल्याची घटना घडली. याची माहिती थेरगाव सोशल फाउंडेशन ला तेथील नागरिकांनी दिली. फाउंडेशन चे सदस्य घटनास्थळी पोहचले, तिथली वाहतूक त्यांनी थांबवली. तोपर्यंत त्याच्याच इतर सदस्यांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचत रस्त्यावरील ऑईल पाण्याने धुवून काढलं आहे. पिंपरी-चिंचवड शहरात या अगोदर देखील अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळं दुचाकी चालकांनी विशेष काळजी  घेऊन दुचाकी चालवण्याची गरज आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर, ऑईल गळती होणाऱ्या टँकर चालकांनी देखील यावर खबरदारी घेतली पाहिजे. जेणेकरून ऑईल गळती होऊन अशा घटना घडणारच नाहीत. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply