पालखी मार्गावरील उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेला सहा कोटी ७५ लाखांचा निधी

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावर, तसेच आळंदी आणि देहूमध्ये करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारने जिल्हा परिषदेला सहा कोटी ७५ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता आणि सोयी-सुविधा पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सहा कोटी ७३ लाख २० हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. एकूण मंजुरीच्या २० टक्के प्रमाणात म्हणजेच एक कोटी ३४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला आहे.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या ५० टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे, असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply