पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:घराप्रमाणेच ऑफिस, कॅम्पस आणि बाजारपेठेत खुली विचारसरणी ठेवा

राज्यव्यवस्थेला योग्य दिशा व गती देण्यासाठी वेगवेगळ्या राजांनी अनेक प्रयोग केले. आपण केवळ राम-कृष्णाबद्दल बोललो, तर अयोध्या व द्वारकेचे प्रयोग आपल्याला आजही प्रेरणा देतील. आपल्याला जगावर प्रभाव पाडायचा असेल, तर आपल्याला जातीयवादाच्या गुंतागुंतीतून बाहेर पडावे लागेल. राजकारणाची तर सवयच आहे की, काही तरी छेडछाड करत मुद्दे उपस्थित करायचे, जेणेकरून मनुष्य त्यात अडकून पडेल आणि राजकारण सत्तेचा खेळ खेळत राहील. परंतु शास्त्रांनी आपल्याला शिकवले आहे की, आपण सर्वात आधी मनुष्य आहोत. भारतात घरांमध्ये हळूहळू पती-पत्नीच्या ‘जेंडर रोल’चे रूपांतर समानता व मैत्रीमध्ये होत आहे, तसेच ऑफिस, बाजार व कॅम्पसमध्येही खुली मानसिकता ठेवावी लागेल. याचा अर्थ स्वैराचार वा राजकारण नव्हे, तर सर्वांप्रति स्वीकारार्हता व सर्वसमावेश होय. कुणीही लहान-मोठे नसते, मोठी किंवा छोटी तर नियत असते. सर्व समान आहेत. योग्यतेला संधी देणे ही ईश्वराची कार्यशैली आहे. राजकारणाने किमान त्यात तरी ढवळाढवळ करू नये.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *