
पंढरपूर : माउलीच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदवडे येथे तर तुकोबारायांच्या पालखीचे गोल रिंगण अकलूज येथे संपन्न झाले.भाविकानाच्या उत्साहाला आलेला उधाण , चैतन्य निर्माण करणारे आणि नेत्रदीपक रिंगण सोहळय़ाने वातावरण भक्तीमय झाले. आज माउलीच्या पालखीचे खडूस येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे मुक्कमी तर संत तुकारम महारज यांच्या पालखीचे माळीनगर येथ गोल रिंगण होऊन बोरगावी मुक्कमी असणार आहे.
पालखी सोहळय़ातील परमोच्च वेळ म्हणजे गोल रिंगण. लष्करी शिस्त , ठरलेले ठिकाण , रिंगण लावण्यासाठी चोपदारांचा इशार आणि डोळय़ाचे पाते लवते न लवते तोच अश्वांची धाव अशा या नेत्रदीपक रिंगणाची भाविकाना आस लागलेली असते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळय़ाचे पहिले गोल रिंगण पुरंदवडे येथे संपन्न झाले. मैदानामध्ये टाळ मृदुंग, डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून महिला, विणेकरी टाळकरी जमा होऊ लागले. त्यानंतर माउलीची पालखी रिंगणाच्या मध्यभागी आली. लगेच माउलीचा अश्वाचे आगमन झाले. अश्वाची आणी पादुकांची पूजा झाली. चोपदारांनी हातातील दंड गोल फिरवला.उपस्थित भाविकांनी माउली माउलीचा जयघोष तर टाळ मृदुंगाचा जयघोष सुरु असतानाचा अश्वाने वेगाने धावत गोल फेरी पूर्ण केली. आणि मग जमलेल्या भाविकांचा उत्साह अजून वाढला. माउलीच्या अश्वावाची पायाची धूळ मस्तकी लावण्याची लगबग झाली. या नंतर जमलेल्या वैश्नावानी फुगडी , सोंग, आदी खेळ खेळून आपल शीणवठा घालवला. मात्र यावेळी कोणताही गोंधळ गडबड न होता पण त्याचा आनंद घेताना भाविक पाहवयास मिळाला .
तर दुसरीकडे जगद्गुरू तुकाराम माहाराज यांचा पालखी सोहळा नीरा नदी ओलांडून मंगळवारी सकाळी ८.२० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे जिल्ह्यात आगमन झाले.यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन जिल्हाधिकारी मििलद शंभरकर यांनी केले. तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाने भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला.यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांचा सत्कार करण्यात आला.अकलूज येथील गांधी चौकात नगरपरिषदेच्यावतीने आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी खा, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण संपन्न झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी जमले.त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण टिपण्यासाठी प्रत्येकजण नजरा एकटक लावून बसला होता. लाखों वारकरी, ग्रामस्थ अश्वाचा नेत्रदीपक सोहळा पाहून तृप्त झाले.दरम्यान, आज म्हणजे बुधवारी माउलीची पालखी माळशिरस येथून प्रस्थान ठेवून खडूस फाटा येथे दिसरे गोल रिंगण होऊन पालखी वेळापूर येथे मुक्कामी येणार आहे. तर संत तुकारम महाराजांची पालखी अकलूज येथून प्रस्थान ठेवून माळीनगर उभे रिंगण झाल्यावर बोरगाव मुक्कमी असणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
