पंजाब : ४ महिलांकडून तरुणावर सामूहिक अत्याचार; जालंधरमधील धक्कादायक घटना

पंजाब : देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना, पंजाबच्या जालंधरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालंधरमध्ये चार महिलांनी मिळून माझ्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप एका तरुणाने केला आहे. कामावरून परतत असताना चार महिलांनी पत्ता विचारण्याचं नाटक केलं. त्यानंतर मला बेशुद्ध करत नऊ ते दहा तास बंदी बनवत सामूहिक अत्याचार केला, असा आरोप या तरुणाने केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

बलात्काराचा आरोप करणार्‍या तरुणाचे म्हणणे आहे की, ज्या महिलांनी त्याच्यावर बलात्कार केला त्यांचे वय 23 ते 26 वर्षांच्या दरम्यान आहे. तक्रारदार तरुणाचे लग्न झाले असून त्याला दोन मुलेही आहेत.

तरुणाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तो एका खासगी कंपनीत काम करतो. सोमवारी तो कामावरून घरी परतत असताना, वाटेतच त्याला चार महिलांनी रोखलं. पत्ता विचारण्याच्या बहाणा करून या महिलांनी त्याच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यानंतर सदरील तरुण हा बेशुद्ध झाला.

तक्रारदार तरुणाचे म्हणणे आहे, की त्याला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो नग्नावस्थेत एका कारमध्ये होता. त्याचे हातपाय बांधलेले होते. डोळ्यावरही पट्टी बांधण्यात आली होती. या कारमध्ये चार महिला मद्यपान करत होत्या. या महिलांनी आळीपाळीने त्याच्यावर बलात्कार देखील केला.

अत्याचारानंतर या महिलांनी तक्रारदार तरुणाला एका अज्ञातस्थळी नेऊन सोडलं आणि कारमध्ये बसून पळ काढला. दरम्यान, घरी आल्यानंतर या तरुणाने आपल्यासोबत घडलेला प्रकार पत्नीला सांगितला. बदनामीपोटी पत्नीने त्याला पोलिसांत तक्रार करू दिली नाही. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याने पंजाब पोलिसांत तक्रार दाखल केली. सदरील तरुणाच्या तक्रारीवरून पोलिस आता या चार महिलांचा शोध घेत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *