नेपाळमध्ये भीषण स्फोट; दोन भारतीयांचा जागीच मृत्यू,सहाजण गंभीर

काठमांडू : नेपाळमध्ये औद्योगिक परिसरात ऑक्सिजन प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. काठमांडूजवळील ललितपूर जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील सागरमठ याठिकाणी हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत्यू झालेले दोघे बिहारचे रहिवासी आहेत.

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, स्फोट इतका भयंकर होता की अनेक सिलिंडर हवेत उडाले. यातच ब्रिज कुमार महतो (वय-४५) आणि राजकुमार महतो (वय-२५) या दोन भारतीयांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा नेपाळी नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना ललितपूर येथील बी अँड बी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृहराज्यमंत्री बाळकृष्ण खांड यांनी पोलिसांना तातडीने मदतकार्य सुरू करून अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *