“नितीन गडकरी जे काही करतात ते ‘वरून’च करतात, आमचं जुळतं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो”; राज ठाकरेंचं नागपुरात विधान!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते अनेक गाठीभेटी घेणार असून, उद्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करणा आहेत. आज राज ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी फुटाळा तलावाची आणि संगीत कारंजांचा ‘लेझर शो’ची पाहणी केल्यानंतर नितीन गडकरींची स्तुतीदेखील केली आहे.

याप्रसंगी राज ठाकरे म्हणाले “ माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपुरमधील माझ्या सर्व बंधु-भगिनींनो.. मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही. जे काही पाहीलं आहे ते भारताच्या बाहेरच पाहिलेलं आहे. नितीन गडकरी जे काही करतात ते भव्य दिव्यंच असतं. काही खाली करतच नाहीत, ते सगळं वरूनच असतं. कारंजाही वर जातो उड्डाणपूल देखील वर जातो. सगळं वरूनच करतात. पण ते जे विचार करतात. आमचं खरंतर दोघांची मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो. नितीन गडकरी जेव्हा एखादी गोष्ट बोलतात, तेव्हा ते बोलत असताना असं वाटतं की हे सगळं कसं होणार. पण ते झाल्यावर कळतं की हे होऊ शकतं.”

याशिवाय “मला असं वाटतं नितीनजी तुम्ही नागपुरला येण्याचं अजून एक कारण ठेवलं. की नागपुरला का यावं ? नुसतं आता संत्रानगरीत स्वागत याच्या ऐवजी मला आता वाटतं कारंजानगरीत स्वागत असं बोलता येईल. कारण, आम्ही कारंजे भारतात पाहिलेच नाहीत, जे काय पाहिले ते बाथरुमध्येच. त्यामुळे जे काय मी आज पाहिलं ते अद्भूत आहे. फक्त नागपुरकरांसाठीच नाहीतर मला असं वाटतं देशातील लोक हा कार्यक्रम बघण्यासाठी नागपुरमध्ये येतील. ज्यावेळी देशातील लोक नागपुरात येतील त्यावेळी त्यासाठी म्हणून जी बांधणी नागपुरात लागेल, ती देखील होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा नितीन गडकरी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो.” असंही राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply