नाशिक : शहर-ग्रामीण लढाईत बाजी कोणाची?

नाशिक : प्रभाग क्रमांक ३१ चे विभाजन होऊन तयार झालेल्या नवीन प्रभाग क्रमांक ४४ मध्ये यंदा ग्रामीण विरुद्ध शहरी भाग, अशी टोकाची लढाई बघायला मिळणार आहे. त्यात या प्रभागात मोठ्या संख्येने असलेले कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा अर्थात कसमादे आणि खानदेशी मतदारांसोबत इगतपुरी तालुक्यातील मतदारांचा पाथर्डी गावात असलेल्यांशी नातेसंबंधावर उमेदवारांची भिस्त असणार आहे. या प्रभागातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी संभाव्य आरक्षणाची चर्चा असल्याने खुल्या असलेल्या एकमेव जागेसाठी किमान दीड डझन इच्छुक तयारीला लागले आहेत. पाथर्डी भागातून सातत्याने प्रत्येक वेळी नवीन नगरसेवक देण्याची परंपरा जपली आहे. ही परंपरा जपली जाते की विद्यमान नगरसेवक इतिहास बदलतात, हे बघणे रंजक ठरणार आहे. भाजप आणि सेनेमध्ये तिकिटासाठी मोठी रस्सीखेच आहे. त्यामुळे येथून बंडखोरी अटळ आहे. पाथर्डी, दाढेगाव आणि पिंपळगाव खांब या भागात होणारे सुमारे ७० टक्के पेक्षा अधिक एक गठ्ठा मतदान या प्रभागात निर्णायक भूमिका निभावते. दुसरीकडे शहरी भागात मात्र जेमतेम पन्नास टक्के मतदार घराबाहेर पडतात. असे असले तरी सर्वात जास्त इच्छुक पाथर्डी गावात असल्याने मोठे मतविभाजन येथे अटळ आहे. त्यात गावातील भाऊबंदकीमधील वाददेखील आता चव्हाट्यावर येण्यास सुरवात झाली आहे. राखीव जागांवर सक्षम आयात उमेदवार येण्याची चर्चा सुरू झाल्याने आतापासूनच नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. नेहमीप्रमाणे शहरी भागातील अनेक कॉलनी भागात विद्यमान नगरसेवकांबाबत नाराजी व्यक्त होण्यास सुरवात झाली आहे. मनसे- राष्ट्रवादीचीदेखील ठराविक पॅकेटमध्ये मोठी ताकद आहे. कॉलनी भागात असलेल्या इच्छुकांनीदेखील कोरोनाकाळात केलेल्या कामामुळे नागरिकांची मोठी मर्जी संपादन केली आहे. त्याचा मोठा तोटा भाजप आणि सेना दोघांना बसू शकतो. या सर्व बाबींचा प्रत्यक्ष फटका नेमका कुणाला बसतो हे प्रत्यक्ष निवडणुकीत कळणार आहे. प्रभागाची व्याप्ती : पाथर्डी गाव, दाढेगाव, पाथर्डी शिवार मळे परिसर, खत प्रकल्प परिसर, पांडव लेणी परिसर, फाळके स्मारक परिसर, प्रशांतनगर, विक्रीकर भवन परिसर, पोलिस कॉलनी परिसर, पार्क साइड, वासननगर. उत्तर : मुंबई- आग्रा महामार्ग क्रमांक ३, सर्व्हिस रोडवरील सेव्हन हेवन हॉटेल घेऊन पूर्वेकडे कॉलनी रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन लोटस हाऊस, अठरा मीटर डीपी रस्त्याने कर्मा हाईट्स, अठरा मीटर डीपी रस्त्याने पूर्वेकडे दक्ष अॅट्रीयम इमारत, तीस मीटर वडाळा- पाथर्डी रोडपर्यंत, वडाळा-पाथर्डी रस्त्याने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन पाथर्डी वडाळा जंक्शन शिवपर्यंत, पाथर्डी-वडाळा १८ मिटर शिव रोडने मिलिटरी हद्दीपर्यंत, मिलिटरी हद्दीने पिंपळगाव खांब वडनेर शिवरस्त्यापर्यंत, पाथर्डी- वडनेर रस्त्याने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन पार्वती ॲग्रो सर्व्हिसेस घेऊन पिंपळगाव खांब फाट्यापर्यंत. पूर्व : पिंपळगाव खांब- वडनेर शिव रस्त्यापासून दक्षिणेकडे येऊन पाथर्डी वडनेर रस्त्यापर्यंत, पश्चिमेकडे येऊन १५ मीटर डीपी रस्त्यापर्यंत, वडनेर-पाथर्डी रोड, पिंपळगाव खांब फाट्यावरील पार्वती ॲग्रो सर्व्हिसेस पासून पिंपळगाव खांब रोडने दक्षिणेकडे पिंपळगाव खांब महापालिका दवाखान्यापर्यंत, पिंपळगाव वडनेर दुमाला रोडने पूर्वेकडे दक्षिणेकडील भागाने पूर्वेकडील नाल्यापर्यंत, दक्षिणेकडे पिंपळगाव खांब शिवार सर्व्हे क्रमांक ९०, शिवरस्त्याने महापालिका हद्दीवरील टोकापर्यंत. दक्षिण : पिंपळगाव खांब शिवार सर्व्हे क्रमांक ९०, शिवरस्त्याने महापालिका हद्दीवरील टोकापासून पश्‍चिमेकडे महापालिका हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन दक्षिण-पश्चिमेकडील कोपऱ्यातील महापालिका हद्दीपर्यंत. पश्चिम : नाशिक महापालिकेच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यातील हद्दीपासून पश्चिमेकडील महापालिका हद्दीने उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन सर्व्हिस रस्त्याने उत्तर-पूर्व दिशेला सर्व्हिस रस्त्याने हॉटेल सेव्हन हेवनपर्यंत. हे आहेत इच्छुक सुदाम डेमसे, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, संजय नवले, सुदाम कोंबडे, चंद्रकांत खाडे, एकनाथ नवले, रवींद्र गामणे, बाळकृष्ण शिरसाट, मदन डेमसे, सोमनाथ बोराडे, संदेश एकमोडे, डॉ. पुष्पा पाटील- नवले, जितेंद्र चोरडीया, वसंत पाटील, त्र्यंबक कोंबडे, चेतन चुंभळे, सुनील कोथमिरे, गणेश ठाकूर, दीपक केदार, माधुरी नवले, सोनाली नवले, माधुरी डेमसे, शैला दोंदे, अर्चना गामणे, शारदा दोंदे, ॲड. जगदीश काजळे, अनिता ठाकूर, रोहिणी केदार, अंकुश भोर, अनिल गायकवाड, ज्ञानेश्‍वर महाजन, उत्तम उघाडे, किरण भुसारे, योगेश कोंबडे, अमित जाधव, पुष्पा बोराडे, पूजा तेलंग, सोमनाथ शिंदे, रोहिणी महाजन, किरण कोंबडे, चेतन कोथमिरे, साहेबराव आव्हाड.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply