नाशिक महापालिका आयुक्तपदी रमेश पवार,अखेर शिक्कामोर्तब

नाशिक : महाराष्ट्र शासनाने मुंबई महापालिकेतील सह आयुक्त (सुधार) रमेश पवार यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. लवकरच ते या पदाचा पदभार स्वीकारतील. अभियांत्रिकीचे पदवीधारक असलेल्या पवारांनी अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवी मुंबईतील व्हीजेटीआयमधून प्राप्त केलेली आहे. पवार यांना महापालिकेतील ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सह आयुक्त म्हणून विविध खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. अजोय मेहता आणि प्रवीण परदेशी हे महापालिकेचे आयुक्त असताना आयुक्त कार्यालयाची जबाबदारी त्यांनी ५ वर्षे चांगल्यारितीने सांभाळली आहे. शिवाय कोरोनाचा विस्फोट झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात आरोग्य विभागात त्यांनी खूप मूलभूत काम केले आहे. मुंबई महापालिकेतील विविध योजनांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. नाशिकमध्ये या योजना राबविण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील राहतील. सध्या पवार मुंबई महापालिकेत सहआयुक्त (सुधार) या पदावर कार्यरत आहेत. हे महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचे पद असून पूर्वी या पदावर अजोय मेहता, सीताराम कुंटे, आर. ए. राजीव, सतीश भिडे, राधा अशा नामवंत आयएएस अधिकाऱ्यांनी काम केले आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply