नाशिक – नाशिकमध्ये भरदुपारी धावत्या कारला लागली आग

नाशिक - नाशिकमध्ये भरदुपारी एका कारला आग लागल्याचा व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये बर्निंग कारचा थरार दिसतं आहे. मुंबई-नाका परिसरातमध्ये या धावत्या कारला अचानक आग लागल्याने चालकासह शेजारी असणाऱ्या माणसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवल्याने सुदैवानं जीवित हानी झाली नाही. मात्र, भर दिवसा वर्दळीच्या रस्त्यावर ही आगीची घटना घडल्याने काही काळ गोधळाचं वातावरण होतं.

यावेळी अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात यश आलं आहे. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, सध्या राज्यभरात तापमानात मोठी वाढ झाली असून या तापमानामुळे अनेक एका जागेवरती उभ्या असलेल्या दुचाकींना आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता धावत्या चार चाकी कारलाच आग लागल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *