नाशिक : शहरात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आल्यानंतर महापालिकेने आता कोव्हिड सेंटर गुंडाळण्याची तयारी केली असून, यापूर्वी करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लान्टचा योग्यरितीने वापर होण्यासाठी गोदावरी व उपनद्यांच्या प्रदूषणमुक्ती ऑक्सिजन उपयोगात आणला जाणार आहे. मलनिस्सारण केंद्रातील सांडपाण्यावर ऑक्सिनायझेशनची प्रक्रिया केली जाणार आहे.
कोरोना तिसरी लाट जवळपास संपुष्टात आली आहे. मंगळवारी (ता. १५) शहरात एकही रुग्ण आढळून न आल्याने वैद्यकीय विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तिसरी लाट ओसरल्याने महापालिकेकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना तिसऱ्या लाटेत कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने अन्य बाबीवरचा खर्च कमी करून वैद्यकीय व्यवस्थेवरचा खर्च वाढविला.
कोरोना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेमध्ये एकूण १९ लाख ५२ हजार ७४५ संशयित रूग्ण आढळले. त्यातील दोन लाख ७२ हजार ७०० रुग्ण बाधित आढळले. बाधितांपैकी चार हजार १०५ जणांचा मृत्यू झाला. जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरवात झाली. जानेवारी महिन्यात तिसरी लाट येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने कोरोना उतरणीला लागला. २३ जानेवारीला दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. सक्रिय रुग्णसंख्या १०, ९४८ पर्यंत पोचली होती, तर पॉझिटिव्हिटीचा दर ३९ टक्क्यांपर्यंत होता. परंतु, आता हाच दर आता शून्यावर आला आहे.
शहरात शून्य रुग्णसंख्या झाल्याने नवीन बिटको व डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयाचा कोव्हिड दर्जा काढून घेण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली, लसीकरण केंद्रे कमी करण्यात आली. डेटा एन्ट्री ऑपरेटर निवडणूक कामासाठी वर्ग करण्यात आले. नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्टचा नदी शुद्धीकरणासाठी उपयोग केला जाणार आहे. कोव्हिड सेंटरसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (पीएसए) उभारण्यात आला होता. महापालिकेने सीएसआर फंड व स्वखर्चातून २२ पीएसए प्लान्ट उभारले.
तिसरी लाट ओसरल्याने कोविड सेंटर बंद केली जाणार आहे. ऑक्सिजनचा उपयोग ओझोनायझेशन प्रक्रियेसाठी केला जाणार आहे. नदीच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढून प्रदूषणाची पातळी कमी होत असल्याने तेथे उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिटको व झाकिर हुसेन रुग्णालय वगळता इतरत्र बसविण्यात आलेले पीएसए प्लान्ट काढून मलनिस्सारण केंद्रांमध्ये बसविण्याच्या सूचना पालिका प्रशासक कैलास जाधव यांनी दिल्या.
नैसर्गिक नाल्यांवर प्लांट
महापालिकेने कोव्हिड काळात बावीस पीएसए प्लान्ट उभारले होते. सर्व प्लान्ट नैसर्गिक नाले व मलनिस्सारण केंद्राच्या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. गोदावरी नदीच्या शहरातील १९ किलोमीटरच्या प्रवासात बावीस ठिकाणी पीएसए प्लान्ट स्थलांतरित केले जाणार आहे. ऑक्सिजनच्या माध्यमातून पाण्यातील ऑक्सिजन पातळी (बायोमेडिकल ऑक्सिजन डिमांड) वाढवून पाणी शुद्धीकरण केले जाणार आहे.हे पण वाचा-
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

