नाशिक : देशातील सर्वात मोठ्या नोटांच्या कारखान्यातील गोडाऊनला आग; परिसरात धुराचे लोट

नाशिक: देशाचं कागदी चलन अर्थात् नोटा जिथे छापल्या जातात त्या कारखान्याला आग लागल्याची धक्कादयक घटना घडली आहे. नाशिकच्या चलार्थ पत्र मुद्रणालय या कारखान्यातील प्रेस नोटच्या गोडवूनला आग लागली आहे. सीएनपी कारखाना प्रेस चलनी नोटांचा देशातील सर्वात मोठा कारखाना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यातील स्क्रॅप झोनला आग लागली आहे, त्यामुळे परिसरात - धुराचे लोट परसले असून आग भडकल्याने परिसरात पळापळ झाली आहे. दरम्यान अग्निशमन विभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

करन्सी नोट प्रेस नाशिक प्रत्यक्षात देशातील सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत येते. या महामंडळाचे देशभरात ९ युनिट्स आहेत. नाशिकमध्ये त्याचे दोन युनिट्स आहेत. एक चलनी नोटा छापते आणि दुसरे युनिट स्टॅम्प पेपर, रेव्हेन्यू स्टॅम्प, पासपोर्ट आणि व्हिसा इत्यादी प्रिंट करते. नाशिकचे हे करन्सी प्रेस मुंबईपासून १८८ किमी अंतरावर आहे. याच ठिकाणी 1928 मध्ये ब्रिटीश राजवटीत पहिली नोट प्रिंटिंग मशीन बसवण्यात आली होती. यानंतर भारतात चलनाची छपाई इथे सुरू झाली.

येथे उच्च दर्जाच्या नोटा छापल्या जातात. हा भारतातील असा छापखाना आहे, जिथे एकेकाळी नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश, बांगलादेश, पूर्व आफ्रिका आणि इराक या देशांचे चलन छापले जायचे. नाशिकचे चलन छपाईचे क्षेत्र 14 एकरांवर पसरलेले आहे. यासोबतच एक हाय सिक्युरिटी प्रिंटिंग कॉम्प्लेक्स देखील आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल देखील आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply