नाशिकमध्ये सिन्नर-शिर्डी मार्गावर खासगी बस-ट्रकची समोरासमोर धडक, १० प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास  खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात खाजगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला असून या १० जणांचा मृत्यू झाला आहे.

यात दोन पुरुष, सहा महिला तर दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात खासगी बसमध्ये ३५ ते ४५ प्रवासी असल्याची प्रवास करत होते. यातील पंधरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर येथील खासगी तसेच शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. या अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अपघातील ट्रक शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने जात होते. तर खासगी बस सिन्नरच्या दिशेन येत होती. पाथरे या गावाजवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात साधारण ३५ प्रवाशी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. मात्र आता पोलीस आणि बचावपथकाच्या माध्यमातून ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *