नागपूर : लकडगंज परिसरात भीषण आग, फर्निचरचे पाच दुकानं जळून खाक

नागपूर : शहरातील लकडगंज परिसरातील लाकडाच्या गोडाऊनला  भीषण आग लागली आहे. यामध्ये सहा आरामशिन जळून खाक झाल्या आहेत. सध्या ९ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लकडगंज परिसरातील लाकडाच्या गोडाऊनला आज सकाळच्या सुमारास आग लागली. यावेळी परिसरातील नागरिकांनी अग्नीशमन दलाला फोन करून माहिती दिली. पण तोपर्यंत आगीने अधिक रौद्र रुप धारण केलं होतं. या परिसरातील पाच सहा फर्निचरचे दुकान देखील जळून खाक झाले आहेत. तसेच सहा आरामशिन आगीत जळाल्या आहेत. सध्या अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आग कशामुळे लागली? याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पण, ट्रान्सफॉर्मरमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *