नागपूर : बामनमारी नदीत स्कॉर्पिओला जलसमाधी; आठ जणांचा शोध सुरू

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. याच धुवाँधार पावसात एक स्कॉर्पिओ वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर जिल्ह्याच्या केळवद येथील बामनमारी येथे ही घटना घडली आहे. वाहून गेेलेल्या गाडीमध्ये 8 प्रवासी असल्याचे सांगितले जात असून, त्यांचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घटनेत गाडीतील सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीत व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह विदर्भात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून, याच पावसामुळे बामनमारी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात गाडी चालकाने पुलावरून पाणी वाहत असतानादेखील गाडी नेण्याचे धाडस दाखवले. त्याचवेळी पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने गाडी नदीत वाहून गेल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली गाडी पुलापासून काही अंतरावर अडकली आहे. मात्र, त्यात असणाऱ्या प्रवाशांचं नेमकं काय झालं याबद्दल अद्यापपर्यंत कोणतीही ठोश अशी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे गाडीतीस सर्व जण वाहून गेल्याची किंवा मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्कॉर्पिओमधील प्रवासी हे मध्य प्रदेशातील पांढूर्णा या परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply