नागपूरात निच्‍चांकी तापमानाची नोंद; प्राणी संग्रहालयात लावले हिटर

नागपूर : नागपूरमध्ये सध्या हुडहुड भरणारी थंडी असून मोसमातील निच्‍चांकी तापमानाची नोंद आठवड्याच्‍या सुरवातीला झाली आहे. नागरिक थंडीपासून बचाव करण्याकरिता गरम कपडे, शेकोटीचा वापर करत आहे. 

 
नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांना थंडीपासून बचाव करण्याकरिता प्राण्यांच्या पिंजरा बाहेर हिटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रात्री आणि सकाळच्या थंडीच्या वेळी प्राण्यांना पिंजराच्या मागील भागात आणून त्यांना हीटर मध्ये ठेवले जात आहे. सोबतच त्यांच्या पिंजऱ्यात पाला पाचोळ्याची व्यवस्था केली आहे. जेणेकरून त्यांना नैसर्गिक गर्मी मिळेल; यासोबतच त्यांच्या आहारात देखील बदल करण्यात आला आहे.
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply