नांदेड जिल्ह्यात सकाळच्या सत्रामध्ये शाळा सुरू

नांदेड : मार्चच्या अखेरीस तापमानात चांगलीच वाढ झाली असून, एप्रिलमध्ये पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व माध्यमांच्या शाळा गुरुवारपासून (ता.२४) सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय बुधवारी (ता. २३) जाहीर केला आहे. त्यामुळे शाळांना आता वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे.

शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात शाळांच्या वेळा बदलण्याबाबत निर्णय घेण्यात येतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीतही वेळा बदलण्यावर चर्चा करण्यात आली होती. शिक्षक संघटना आणि पालक वर्गातूनही शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी होत होती. याबाबत बुधवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आदेश काढले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

आता सोमवार ते शुक्रवार शाळा सकाळी साडेआठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत भरणार आहे. तर शनिवारी सकाळी साडेआठ ते साडेअकरा असा वेळ ठरविण्यात आला आहे. मध्यंतर हा केवळ १५ मिनिटांचा राहणार आहे. त्यामुळे तळपत्या उन्हात विद्यार्थी आणि शिक्षकांची होणारी गैरसोय दूर होईल. हा निर्णय खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनाही लागू राहणार आहे, असेही शिक्षण विभागाने आदेशात म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply