नवी मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, एक कोटी रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त

नवी मुंबईतील खारघरमध्ये क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक कोटी रुपये किंमतीचे ड्रग्स आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. नवी मुंबई क्राइम ब्रांचला खारघरमधील एका इमारतीमध्ये ड्रग्स आणि गांजाची पार्टी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. (

प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबई क्राइम ब्रांचने  या इमारतीवर छापा मारत त्याठिकाणी उपस्थित 6 महिला आणि 10 पुरुषांना अटक केली आहे. हे सर्व नायजेरियन नागरिक आहेत. आज नवीन वर्षा निमित्त जंगी पार्टी करण्याचे नियोजन आखण्यात आले होते. मात्र त्याआधीच पोलीसांना माहिती मिळाल्याने नवी मुंबई गुन्हे शाखेने तेथे उपस्थित 16 नायजेरियन नागरिकांना अटक करत त्यांच्याकडील 1 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त केलेत.

नवीन वर्षाचे आगमन होत असताना सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे. अशात काही व्यक्ती  आमली पदार्थांचे सेवन करत २०२२ चा निरोप घेण्याच्या तयारीत आहेत. अशा सर्वांवरच मुंबई पोलिसांची बारीक नजर आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. अशात आज खारघरमध्ये अशाच पार्टीचे आयोजन करण्यात आले होती. मात्र पोलिसांनी ही पार्टी उधळून लावली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply