नवी मुंबईत विवाहितेने 5 वर्षीय मुलासह इमारतीवरुन मारली उडी, धक्कादायक कारण आलं समोर; पतीला अटक

नवी मुंबई : सासरकडील मंडळीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या 5 वर्षीय मुलासह सातव्या मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या केली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे, तर मुलगा गंभीर जखमी आहे.

आरती विजेंद्र मल्होत्रा असं मृत महिलेचं नाव आहे. तर अरवीक असं गंभीर जखमी मुलाचं नाव आहे. अरवीकवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि नणंदेविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

सोमवारी सासू आणि नणंदने आरतीला तिच्या मुलापासून दूर ठेऊन घराबाहेर जाण्यास सांगितले. यामुळे आरतीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची तक्रार आरतीच्या भावाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply