नवी दिल्ली : यंदाची IPL ठरवणार रोहितचा वारसदार : शास्त्री

नवी दिल्ली: आयपीएलच्या 15 वा हंगामाकडे (IPL 2022) प्रत्येक जण वेगवेगळ्या नजरेने पाहतो. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड हे टी 20 वर्ल्डकपसाठी संघ तयार करण्याच्या दृष्टीने याकडे पाहतील तर काही वरिष्ठ आणि युवा खेळाडू टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी आयपीएलकडे एक संधी म्हणून पाहतील. मात्र भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री  यंदाच्या हंगामाकडे वेगळ्याच नजरेतून पाहत आहेत. त्यांच्या मते हा हंगाम हा भारताचा कर्णधार रोहित शर्माचा उत्तराधिकारी  देखील ठरवेल. मुलाखती दरम्यान भारताच्या भविष्यातील कर्णधाराबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, 'विराट कोहली आता कर्णधार नाहीये. रोहित शर्माने आतापर्यंत चांगले नेतृत्व केले आहे. विशेषकरून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने चांगले नेतृत्वगुण दाखवले आहेत. पण, भारताला आता भविष्यातील कर्णधार देखील शोधावा लागणार आहे. सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात श्रेयस अय्यर , ऋषभ पंत आणि केएल राहुल या पदासाठी दावेदारी सांगत आहेत. हे सर्व जण यंदाच्या आयपीएल हंगामात त्यांच्या त्यांच्या संघांचे नेतृत्व करणार आहेत. भारत भविष्यात एका तगड्या कर्णधाराच्या शोधात असेल आणि आयपीएल हे या कर्णधार पदावर दावा सांगणाऱ्यांसाठी एक महत्वाचे व्यासपीठ असणार आहे.' रवी शास्त्री यांनी ही आयपीएल हार्दिक पांड्यासाठी देखील महत्वाची असल्याचे सांगितले. तो गोलंदाज, फलंदाज आणि कर्णधार म्हणूनही कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. याचबरोबर लिलावात अनसोल्ड राहिलेला सुरेश रैना  आता समालोचक म्हणून आपली नवी इनिंग खेळत आहे. सुरेश रैनाने देखील तो यंदाच्या आयपीएलमध्ये इशान किशन, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरवर नजर ठेवून असणार आहे. चेन्नई सुपर किंग्जमधील मोईन अली आणि रविंद्र जडेजा यांच्यावरही रैनाचे लक्ष असणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply