नवी दिल्ली : द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती, देशभरात जल्लोष

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत. आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने ओडीसासह संपूर्ण देशभरात जल्लोष केला जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष केला आहे. आज राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. मतमोजणी दरम्यान मुर्मू आघाडीवर असल्याने त्यांचा विजय निश्तित मानला जात होता. मुर्मू यांच्या विरुद्ध विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा निवडणुकीत उतरले होते. द्रौपदी मुर्मू यांना ५४० हून अधिक मतं मिळाली आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०४ मतं मिळाली आहेत. भाजपने द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केल्यापासूनच त्यांची चर्चा देशभर सुरू होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply