नवाब मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला; २२ एप्रिलपर्यंत कोठडी

 

मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. मलिक यांना आज, सोमवारी पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात मलिक यांना ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मलिक यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दाऊदशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. अटक झाल्यापासून ते तुरुंगातच आहेत. त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. याच प्रकरणात ईडीने गेल्याच आठवड्यात मलिक यांना मोठा दणका दिला होता. ईडीने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित मालमत्तांवर टाच आणली होती. मुंबईसह उस्मानाबादमधील त्यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडील गोवावाला कम्पाउंड, कुर्ला पश्चिमेकडील व्यावसायिक मालमत्ता, उस्मानाबादमधील १४७.७९४ एकर शेतजमीन, कुर्ला येथील तीन फ्लॅट आणि वांद्रे पश्चिमेकडील दोन फ्लॅट जप्त केले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply