धक्कादायक! सहकारी हवालदारानेच केला महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग; गुन्हा दाखल

मुंबई: मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात सहकारी अधिकारी महिलेचा पोलिस शिपायाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हा महिला अधिकाऱ्याला (Female Police Officer) व्हॉट्सॲपवर (Whatsapp) हेतू पुरस्सर मेसेज पाठवत होता. इतकचं काय तर महिला अधिकाऱ्याचा पाठलागही करायचा. दरम्यान ८ एप्रिलला आरोपी शिपायाने महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवर रात्री १२ च्या सुमारास प्रपोजल मेसेज पाठवला. 

सहकारी पोलिस शिपायाच्या दिवसें-दिवस वाढत असलेल्या या त्रासाला कंटाळून महिला अधिकाऱ्याने संबधित सहकारी पोलिस हवालदाराविरोधात खार पोलिस ठाण्यात ३५४(ड), ५०९, भा.द.वि सह ६७ माहिती तंत्रज्ञान ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. महिला पोलिस शिपायाची छेड अथवा फसवणुकीचा हा काही पहिलाच गुन्हा नाही. नुकताच विलेपार्ले पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीच्या प्रकरणांमुळे महिला सुरक्षित नसल्याची टीका केली जात असताना. या घटनेमुळे पोलिस ठाण्यातील महिलाही असुरक्षित असल्याचे दिसून येते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply