दौंड : मेल्झर केमिकल चोरीप्रकरणी दहा आरोपींना अटक

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्झर केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील 48 लाख 50 हजार 914 रूपये किंमतीच्या केमिकल चोरीप्रकरणी पोलिसांनी आणखी दहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 13 लाख 62 हजार 729 रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्झर कंपनीत 5 मार्च 2022 रोजी चोरटयांनी नायट्रो मिथेन केमिकलचे प्रत्येकी 250 किलो वजनाचे 56 ड्रम चोरीला गेल्यासंदर्भात दौंड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. चोरीला गेलेल्या केमिकलची किंमत 48 लाख 50 हजार 914 रूपये होती. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी सदर गुन्हाचा तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून ठिकठिकाणी पाठवली. या पथकाने केमिकल चोरीप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दोन व आणखी दहा आरोपींना अटक केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *