Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटकचे सुरुवातीचे‌ कल आले; काँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपचे स्वप्न भंगले

Karnataka VidhanSabha Election Result 2023 : कर्नाटकमधील 224 जागांसाठीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. तर काँग्रेस राज्यात सत्ता स्थापन करताना दिसत आहे.

यातच काँग्रेस 117 जागांवर आघाडीवर असून भाजपला 75 जागांवर असल्याचे दिसत आहे. तर जेडीएस 23 जागा मिळाल्या आहेत.

कर्नाटक निवडणुकीतील अनेक बड्या नेत्यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यापासून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, जगदीश शेट्टर आणि कुमारस्वामी यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. 

भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात मुख्य लढत आहे. कर्नाटकातील अशा हायप्रोफाईल जागेबद्दल जाणून घेऊ जिथून मोठे नेते निवडणूक रिंगणात आहेत.

  • जगदीश शेट्टर 7400 मतांनी पिछाडीवर आहेत.

  • एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी रामनगरा मतदारसंघातून आघाडीवर आहे.

  • निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले जगदीश शेट्टर सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पिछाडीवर आहेत.

  • सिद्धरामय्या वरुण मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

  • शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पिछाडीवर आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply