देशात येत्या 4 ते 5 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भात अलर्ट जारी

देशात येत्या चार -पाच दिवसात उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविलाय. विदर्भात देखील उष्णतेच्या लाटेची झळ पोहोचणार असून विदर्भाला देखील अलर्ट देण्यात आल्याची माहीती, भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ सखा सानप यांनी दिलीय. वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने हा अलर्ट नुकताच जारी केलाय. 28 एप्रिल ते 2 मे पर्यंत अलर्ट देण्यात आलाय. या भागातील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडु नये, तसेच सतत पाणी, पन्ह ORS, ताक अशा गोष्टींनी स्वत:ला हायड्रेट ठेवावे असा सल्लाही देण्यात आलाय.

महाराष्ट्रात एप्रिलच्या सुरुवातीला पारा ४४ अंस सेल्सिअस पर्यंत गेला होता. आता उत्तर भारत, मध्य भारतात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट असून उत्तर आणि मध्य भारतातून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असल्याची माहीती डॉ सानप यांनी दिलीय.

महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान ब्रम्हपूरी येथे 45.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. त्यापाठोपाठ अकोला आणि नागपूर 44.8 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 44.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालीय. मध्य महाराष्ट्रात मालेगाव- 43.2, सोलापूर- 43 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेलेय. वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे उष्णतेच्या लाटांच्या प्रमाणात वाढ झाली असून हे हवामान बदलाचे संकेत असल्याची शक्यता वर्तविली जातेय



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply