देशात दरवर्षी दीड लाख रुग्णांची मूत्रपिंडे होतात निकामी

पुणे - मूत्रपिंड (Kidney) निकामी झालेल्या सुमारे दीड लाख रुग्णांची नोंद देशात दरवर्षी होते. परंतु यातील केवळ सहा हजार रुग्णांचेच प्रत्यारोपण होते. डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस इंडियाकडून दिलेल्या माहितीतून ही बाब स्‍पष्ट होते. त्यामुळे मेंदूमृत (ब्रेन डेड) रुग्णांच्या नातेवाइकांनी अवयव दानाचे महत्त्व समजून घेणे आवश्‍यक आहे. अवयवदानाविषयी जनजागृती करण्याची गरज असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक आणि युरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विलास साबळे यांनी सांगितले. जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. साबळे बोलत होते. या प्रसंगी डॉ. डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजचे साहायक्क प्राध्यापक डॉ. पवन वाखारे उपस्थित होते.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply