देशातील पहिले विधी महाविद्यालय कंत्राटी प्राध्यापकांच्या भरवशावर

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा देशातील पहिल्या दहामध्ये समावेश आहे. कित्येक दिग्गज नेते आणि विधिज्ञ या महाविद्यालयाने घडविले आहेत. अशा या नामवंत विद्यालयाकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ दुर्लक्ष करीत असल्याने महाविद्यालयात कंत्राटी प्राध्यापक नेमण्याची वेळ आली आहे.

पुढाऱ्यांच्या खासगी विधी महाविद्यालयांच्या पालनपोषणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा बळी दिला जात असल्याची चर्चा आहे. या महाविद्यालयात अत्याधुनिक क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, नियमित प्राध्यापक, आणि सुसज्ज इमारतसुद्धा नाही. इमारत जुनी झाली आहे. २०२५ साली या महाविद्यालयाला शंभर वर्षे होणार आहेत.१९२५ साली ‘युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉ’ची स्थापना करण्यात आली. भारतात स्थापन झालेले १० वे एकमेव लॉ कॉलेज होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply