देवेंद्र फडणवीस : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाबाहेर राहणार

मुंबई : आज भाजपनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदं घेतली. यावेळी त्यांनी एक मोठा आणि अनपेक्षित निर्णय घेतला. तो म्हणजे, एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री करणार असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं.

शिवाय भारतीय जनता पक्षाचा त्यांना पाठिंबा असल्याचं फडणवीसांनी यावेळी जाहीर केलं. मात्र, याच वेळी आपण मंत्रीमंडळाच्या बाहेर राहणार असल्याचं देखील फडणवीसांनी जाहीर केलं आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, '२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची युती होती.

या माध्यमातून भारतीय जनता पार्टी १०५ जागा सेनेने ५६ जागा जिंकल्या सेना भाजपसह अपक्ष आमदारांचे मिळून जवळपास १७० लोक निवडून आले होते. सर्वांना अपेक्षा होती की सरकार सेना आणि भाजपचे तयार होईल. शिवाय नरेंद्र मोदींनी भाजपचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा वारंवार केली होती

मात्र, दुर्दैवाने निकालानंतर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा आजन्म विरोध केला आणि ज्यांनी हिदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवलं. जनतेने आघाडीला नव्हे तर युतीला मतं दिली होती. त्या मतदारांचा अपमान झाला. आघाडी अस्तित्वात आली आणि अडीच वर्षात राज्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला. राज्याच्या इतिहासात प्रथमच मंत्रीमंडळातील २ मंत्री तुरुंगात असल्याचं ते म्हणाले.

तसंच एकीकडे सातत्याने दाऊदचा विरोध कयायचा आणि दाऊदशी संबंधित असलेल्या मंत्र्याना मंत्रीमंडळातून बाहेर काढलं नसल्याचंही ते म्हणाले. शिवाय रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, हिंदुत्वाचा अपमान करायचा. काल जो औरंगाबादचे नावं संभाजीनगर केलं त्याबाबतचा निर्णय घाईगडबडीत घेतला. मात्र, येणाऱ्या सरकारला हा निर्णय पुन्हा घ्यावा लागणार आहे आणि त्याला आमचं त्याला समर्थनच असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

दरम्यान, यावेळी बोलताना ते म्हणाले, आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विधीमंडळ गट आणि १६ अपक्ष आमदारांचा मोठा गट सोबत आला आहे. याबाबतचे पत्र आपण राज्यपालांना दिलं आहे. ही हिंदुत्वाची लढाई असून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला आहे की, भारतीय जनता पार्टीचे समर्थन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होतील आणि त्यांचा आज रात्रीचं ७.३० वाजता शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होणार असल्याचं जाहीर केलं. तर आपण मंत्रीमंडळाबाहेर राहणार असल्याचं जाहीर केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply