दुभाजकाला धडकून कार २० फूट उंच उडाली; पुणे- सातारा महामार्गावरील भीषण अपघात

पुणे : पुणे- सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाजवळ आज भीषण अपघात झाला. पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार दुभाजकाला धडकून २० फूट उंच उडाली. दुभाजक ओलांडून समोरच्या लेनमध्ये कार गेल्याने अपघात झाला. 

पुणे- सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जातं असताना हा अपघात झाला. पाऊस सुरू असल्‍याने कार चालकाला रस्‍त्‍याचा अंदाज आला नाही. यामुळे कार दुभाजकावर धडकली. कारची धडक इतकी जोरात होती, की कार २० फूट उंच उडाल्‍याचे प्रत्‍यक्षदर्शीनी सांगितले. कार उंच उडाल्‍यानंतर दुभाजकाच्‍या दुसऱ्या बाजूला जावून पडली.

महामार्गावरून भरधाव वेगाने जात असलेल्‍या कारचा अपघात झाला. कार दुसऱ्या बाजूने पडल्‍यानंतर सुदैवाने समोरून येणारे दुसरे वाहन नसल्याने आणि कारमधील एअरबॅग वेळीच उघडल्याने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारमधील चौघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रवाना केले आहे. अपघातानंतर मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *